जिल्हा नियोजन सभेत क्रीडा शिक्षकांचा एकमुखाने ठराव
राज्य अधिवेशनाला जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन
तळेरे (प्रतिनिधी) : दि.12,13,व 14 एप्रिल रोजी शिर्डी जि. अहिल्यानगर या ठिकाणी शारीरिक शिक्षण शिक्षकांचे दुसरे राज्य अधिवेशन संपन्न होणार आहे. या राज्यअधिवेशना संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची सभा नुकतीच माध्यमिक पतपेढीच्या सभागृहातील संपन्न झाली या सभेत “शाळा तिथे क्रीडा शिक्षक” हा ठराव उपस्थित शिक्षकांनी अधिवेशनात मांडण्याचा निश्चितच केला आहे.
ही सभा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य युवा संघटनेचे राज्य सचिव तथा हिर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला व्यासपीठावर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुरान, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड,जिल्हा पदाधिकारी संजय पेंढुरकर,विठ्ठल खांडवी,अनिकेत वेतुरेकर,संदेश तुळसनकर,राहुल चौगुले,अंबादास जोफळे,किरसिंग पाडवी,बाळकृष्ण कदम,राष्ट्रीय खेळाडू क्रीडा शिक्षिका श्रीम- माधुरी खराडे, अमोल चौगुले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वागत जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण यांनी केले व आपल्या प्रास्ताविकात शारीरिक शिक्षण शिक्षकांचे शिर्डी येथे होणारे दुसरे राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी गुगल फॉर्म भरून सहभागी होण्याचे आवाहन केले. याशिवाय सभेत नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर स्पर्धेत पदक विजेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा शिक्षक – शिक्षिका श्रीम. माधुरी खराडे, विठ्ठल खांडवी, शैलेश मुळीक यांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पेंढुरकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव सभेत घेण्यात आला.तर’ सुंदर मुख्यमंत्री शाळा’ जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कनेडी प्रशालेचे क्रीडाशिक्षक व पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचाही अभिनंदनचा ठराव याप्रसंगी घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय मारकड यांनी करताना ऑनलाइन गुगल फॉर्म भरणे व अधिवेशनासाठी जाण्याची व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती दिली
शाळा तिथे क्रीडाशिक्षक एकमुखाने ठराव मंजूर
“शाळा तिथे क्रीडा शिक्षक”ही मागणी येत्या राज्य अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा ठराव मांडणार असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष व युवा संघटनेचे राज्य सचिव दिनेश म्हाडगूत यांनी सांगितले व सभेत ठराव घेण्यात आला. या सभेला उपस्थित क्रीडा शिक्षकांनी अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून दुसरे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार केला. अधिवेशन संदर्भात सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी तालुकावार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समिती पुढीलप्रमाणे –
वैभववाडी तालुका- संदेश तूळसनकर, संजय राठोड, रामचंद्र घावरे, आनंदा जाधव
देवगड तालुका- उत्तरेश्वर लाड, मोहन सनगाळे, आकाश पारकर, बाळासाहेब ढेरे, राजेंद्र गर्जे, रुपेश बांदेकर व सागर फाळके
कणकवली तालुका- विठ्ठल खांडवी, निलेश फोंडेकर, अंबादास जोफळे, किरसिंग पाडवी, श्री.तडवी,बाळकृष्ण कदम व अमोल चौगुले
मालवण तालुका- महेंद्र वारंग, शाम वारंग, शैलेश मुळीक व एन डी पवार
कुडाळ तालुका- अनिकेत वेतुरेकर, श्रीम- माधुरी खराडे, दीपक तारी
वेंगुर्ला तालुका- किशोर सोनसुलकर,हेमंत गावडे,दीपक बोडेकर
सावंतवाडी तालुका- रामकृष्ण सावंत, रोहन पाटील, प्रकाश पावरा
दोडामार्ग तालुका- सोमनाथ गोंधळी संतोष मेथे आदी
या सभेत अधिवेशन तयारी संदर्भात माहिती , ऑनलाईन गुगल फॉर्म भरणे, प्रवास व्यवस्था, स्मरणिका जाहिराती, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तीला निमंत्रण देणे अशा अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली. शिर्डी येथे होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षक राज्य अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरणे अत्यावश्यक असून जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी लवकरात लवकर भरून घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बयाजी बुरान व सचिव दिनेश म्हाडगूत यांनी केले आहे. शेवटी संजय पेंढुरकर यांनी आभार मानून सभेची सांगता केली.













