नॅशनल धनुर्विद्या स्पर्धेत डबल गोल्ड मेडल विजेत्या अक्सा शिरगावकर चा पोलीस दलाच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल आर्चरी स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक विजेत्या अक्सा मुदस्सरनझर शिरगावकर हिचा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यावतीने कणकवली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार केला. यावेळी अक्सा हिचे वडील मुदस्सरनझर शिरगावकर, आई तन्वीर शिरगावकर, पोलिस उपनिरीक्षक देठे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दाजी सावंत, वाहतूक पोलिस हवालदार विनोद चव्हाण, पोलिस अंमलदार उपस्थित होते.कणकवली तालुक्यातील कलमठ गावची सुवर्णकन्या अक्सा शिरगावकर हिने मध्यप्रदेश मध्ये झालेल्या १३ वर्षाखालील खुल्या वयोगटात वैयक्तिक दोन सुवर्णपदके प्राप्त केली. त्यासोबतच अक्सा हिने १३ वर्षाखालील वयोगटात आर्चरी च्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक स्कोअर करून नॅशनल रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले आहे. अक्सा हिच्या उज्वल कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान महाराष्ट्र आणि भारत देशात मानाने उंचावली आहे. अक्सा हिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे कौतुक करत सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!