युवा चित्रकर्ती कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने रंगीत धाग्यांपासून विणली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा..

चाैके (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिलला देशभरात साजरी केली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. डॉ. आंबेडकर.यांचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी व्यापलेले होते. मार्गात आलेल्या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी समाजात जे मोठे स्थान मिळवलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी दिलेले योगदान आजही देशवासीयांच्या स्मरणात कायम आहे.

समता,बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे प्रेरणास्थान असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या संघटित व्हा हा मूलमंत्र दिला. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र विणले. हे चित्र विणण्यासाठी तिला सात दिवसांचा कालावधी लागला. रंगीत धाग्यांपासून विणलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे जगातील पहिले चित्र असावे.यापूर्वी तिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, विठ्ठल, गौतम बुद्ध अशी विविध चित्रे रंगीत धाग्यांपासून साकारली.तिच्या या नाविन्यपूर्ण कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!