खारेपाटण महाविद्यालयाच्या वतीने डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात समता जनजागृती फेरी

खारेपाटण बुद्ध विहार येथे अभिवादन सभा संपन्न..

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये मुंबई विद्यापीठ अंतर्गत खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन एस एस. विभागाच्या वतीने खारेपाटण महाविद्यालय ते बसस्थानक मार्गे खारेपाटण बुद्धविहार अशी समता जनजागृती पद फेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.

या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईवलकर ग्रा.पं.सदस्या सौ शितीजा धुमाळे खारेपाटण महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे प्रमुख प्रा.वसीम सय्यद सर,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे उपाध्यक्ष जितेंद्र कदम, खजिनदार संदीप पाटणकर,सचिव संतोष जुवाटकर,कार्यकर्ते प्रथमेश कदम,धीरज जुमलेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर अशोक पाटणकर,युवा कार्यकर्ते मकरंद पाटणकर,भूषण गोवळकर, श्रवण पाटणकर संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा आंकशा संतोष पाटणकर,सचिव आरोही पाटणकर,कार्यकर्त्या सांकीता पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंचशील नगर खारेपाटण येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला सरपंच प्राची ईसवलकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए डी कांबळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी खारेपाटण बुद्धविहार येथे झालेल्या अभिवादन सभेत बोलताना प्राचार्य डॉ ए डी कांबळे म्हणाले बाबासाहेब यांचे कार्य हे एका जाती पुरते किंवा समजा पुरते मर्यादित नव्हते राष्ट्रीय अखंडता सामाजिक समतेचा माध्यमातून देशाला संविधानाच्या माध्यमातून एकसंघ ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.तर सरपंच प्राची ईसवलकर,प्रा.वसीम सय्यद,सचिन पाटणकर यांनी देखील शुभेछा दिल्या.

यावेळी पंचशील विकास मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार संतोष पाटणकर यांनी मानले.

error: Content is protected !!