वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालय येथे आज 14 एप्रिल 2025 रोजी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), विष्णू परब (तालुका सरचिटणीस), वसंत तांडेल(जिल्हा कार्यकारणी सदस्य), वृंदा गवंडळकर(जिल्हा उपाध्यक्ष), सौ सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), हसीना बेगम मकानदार (अल्प संख्याक मोर्चा), वृंदा मोर्डेकर(महिला मोर्चा), रसिका मठकर (महिला मोर्चा), कमलेश गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), रवींद्र शिरसाट (बूथ प्रमुख)आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!