तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकाजवळ दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास एका लग्झरी बसने (MH04MH4747) दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जखमीची अवस्था पाहून संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी व नागरिकांनी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच संतप्त जमावाने संबंधित बसचीही तोडफोड करून मोठे नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.











