ओझरम बौद्धवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सरपंच समृद्धी राणे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

तळेरे (स्वप्नील तांबे) : कणकवली तालुक्यातील तरेळे ओझरम बौद्धवाडी येथील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज पार पडले. गेली अनेक महिने राखडलेल्या रस्त्यासाठी विविध स्तरावर वाडीतील ग्रामस्थानी पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले.

सरपंच समृद्धी राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच समृद्धी राणे, पोलीस पाटील तुषार तांबे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप तांबे, सुधाकर राणे तसेच वाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थानमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!