वैभववाडीत पोलीस कॉन्स्टेबल ची गळफास घेत आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारारपेठीतील गुरव कॉम्प्लेक्स येथे राहात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे वय ४० मूळ गाव कडोली पन्हाळा जि कोल्हापूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ८. ३० वा. सुमारास घडली.त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार चालू होते.

कॉन्स्टेबल अनिल शेटे हे गेली काही वर्षे वैभववाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सहा महिन्यापूर्वी त्यांची विजयदुर्ग पोलीस ठाणेत बदली झाली होती. मात्र त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरु होते. दोन दिवसापूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापूरातुन जाऊन आले होते. गुरुवारी रात्री वैभववाडी बाजारपेठ येथील गुरव कॉम्प्लेक्स येथे त्यांच्या राहत्या खोलीत पत्नी किचनमध्ये जेवण बनवत होती. तर ते बेड रूम मध्ये होते. बराचवेळ ते बेडरूम मधून बाहेर आले नाहीत. म्हणून पत्नीने हाक मारली. हाक मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पत्नी खिडकीतून डोकावून पाहिले असता, ते फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसलें. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर शेजारचे ग्रामस्थ धावत आले तसेच याची माहिती पोलीस ठाणेत दिल्यानंतर तातडीने पोलिसांनी धाव घेत दरवाजा तोडून त्यांना खाली उतरून घेऊन ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे नेले. त्याठिकाणी उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

यापूर्वी सुद्धा त्यांनी दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

error: Content is protected !!