तातडीचे आणि महत्वाचे !सिंधुदुर्ग पोलीस दल आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन च्या वतीने संजीवनी हॉस्पीटल येथे मोफत आरोग्य शिबीर

२ मे रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार मोफत तपासणी

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दल आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन च्या वतीने संजीवनी हॉस्पीटल येथे मोफत आरोग्य शिबीर २ मे रोजी रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ , ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, कान नाक घसा तज्ञ, पुरुषांसाठी पर रेक्टल तपासणी, प्रोस्टेट तपासणी, तसेच सर्व रक्त तपासण्या मोफत केल्या जाणार असून पुढील तपासणी मुंबई मध्ये जी एस बी एस मेडिकल सेंटर दादर येथे मोफत केल्या जाणार आहेत. याहीपुढे एखाद्या रुग्णावर कॅन्सर शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यासाठी आर्थिक सहकार्य कॅन्सर पेशंट एड असोसिएशन करणार असल्याचे संस्थेच्या कार्यकारी संचालक नीता मोरे यांनी सांगितले. संजीवनी हॉस्पीटल येथे आयोजित या मोफत शिबिराचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे.

error: Content is protected !!