वायंगणी येथे घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील खारेपाटण नजीकच्या वायंगणी-बांबरवाडी येथे बंद असलेले घर चोरट्यांनी फोडून ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख ३००० रुपये असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी १ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत झाली असून चोरीची घटना १ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अशोक सदाशिव गिडाळे (५४ रा. वायंगणी-बांबरवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक गीडाळे हे वैभववाडी येथे कामानिमित्त गुरुवार १ मे रोजी सकाळी घरातून गेले होते. तर अशोक गिडाळे यांची पत्नी गावात असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी घर बंद करून गेल्या होत्या. ही संधी चोरट्यांनी साधून घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीचा दरवाजा हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूमधील कंपाट चोरट्यांनी तोडून त्यातील ८०हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गीडाळे दाम्पत्य घरी आले. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा खोलून आतप्रवेश केला केला असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. बेडरूमधील लोखंडी कंपाट फोडलेल्या अवस्थेत दिसून आले. लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अशोक गिडाळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे करीत आहेत.

error: Content is protected !!