कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट-पावणादेवी येथील राजकुमार देसाई यांच्या घरासमोरील जंगलमय भागात डुक्कर मारण्याचा उद्देशाने गावठी बाॅम्ब कुणी अज्ञाताने ठेवला होता.गावठी बाॅम्बचा चावा चरण्यासाठी गेलेल्या गुरांपैकी बैलाने घेतल्याने स्फोट होऊन बैल गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत राजन वसंत तेली (४८, रा. फोंडाघाट-पावणादेवी) यांनी दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उत्तम वंजारे करीत आहेत. गावठी बॉम्बच्या स्फोटात बैल गंभीररीत्या जखमी झाल्याने राजन तेली यांचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले.
गावठी बाॅम्बच्या स्फोटात बैल गंभीर जखमी












