माळगाव हायस्कूल सभागृहासाठी लवकरच निधीची पूर्तता

माजी खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

माळगाव हायस्कूल सभागृहाचे विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

चौके (प्रतिनिधी) : माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावसाठी शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सुमारे 20 लाखाचा निधी दिला आहे. या निधीतून सभागृहाची इमारत उभी राहिली असून सभागृहाची इतर आवश्यक कामे शिल्लक आहेत याबाबत आपण लवकरच सभागृहाच्या शिल्लक कामासाठी निधीची उपलब्धता करून देऊ असे आश्वासन माजी खासदार विनायक राऊत यांनी माळगाव हायस्कूल सभागृह उद्घाटन प्रसंगी दिले. ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावसाठी संजय राऊत यांच्या खासदार निधीतून व माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या अथक प्रयत्नातून सुमारे 20 लाखाचा निधी मंजूर होऊन 60×25 ची सभागृहाची इमारत उभी राहिली आहे या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार राऊत यांच्यासमोर खासदार राऊत यांच्या समवेत माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संस्थाध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्ष अरुण भोगले, सचिव हेमंत हडकर, खजिनदार महादेव सुर्वे, संस्था संचालक शशिकांत सरनाईक, सुरेश मापारी, दिनेश परब, सुधीर पडेलकर, प्रवीण धामापूरकर, आबा परब, दशरथ पडेलकर, चंद्रकांत राणे, भाऊ चव्हाण, शिवरामपंत पालव, विजय पालव, अमित भोगले, प्रदीप मयेकर, आशिष भोगले, अर्जुन परब, पोलीस पाटील किशोर जाधव, वेरली पोलीस पाटील प्रमोद परब, गौतम तांबे, चंद्रकांत माळकर, श्रीनिवास हडकर, राजश्री शेलार, असरोंडी हायस्कूल अध्यक्ष विजय सावंत, डॉ. सुनील परब, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले की प्रशाला सभागृहासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण भोगले यांनी आपल्याशी वारंवार केला होता काही तांत्रिक अडचणीमुळे दोन वेळा निधी मंजूर होऊन मागे गेल्याने सभागृहाचे काम रखडले होते. मात्र अरुण भोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिद्द व चिकाटी न सोडल्याने त्यांच्या अथक प्रयत्नातून राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी 20 लाखाचा निधी दिला. 20 लाखातून इमारत उभी राहिली असून आपण प्रत्यक्षपणे शिल्लक राहिलेली कामे याचा अंदाज घेतला असता अजून या इमारतीसाठी 8 ते 10 लाखांचा निधी आवश्यक आहे. यामुळे आपण लवकरच याबाबत निधीची उपलब्धता करून देऊ व हायस्कूल सभागृह सुसज्ज असे बनवू असे आश्वासन राऊत यांनी दिले. सभागृहासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल अरुण भोगले व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. प्रास्ताविकात बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अरुण भोगले म्हणाले की या प्रश्नासाठी सभागृह व्हावे असे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी यांचे स्वप्न होते कुलकर्णी यांनीही त्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे मंजूर झालेल्या निधी दोन ते तीन वेळा वापस गेला याबाबत ग्रामस्थ नाराज झाले होते मात्र आपण माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्कात सतत राहिल्यामुळे 20 लाखाचा निधी मंजूर झाला. उर्वरित कामांसाठी ही राऊत यांनी निधीचे आश्वासन दिल्याने प्रशालेचे सुसज्ज असे सभागृह लवकरच सर्वांना पहायला मिळेल या कामाबाबत वैभव नाईक हरी खोबरेकर व संस्था संचालक प्रामाणिकपणे पाठपुरावा केला होता. याबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय खोत यांनी सर्वांच्या आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता माळगावकर, प्रास्ताविक अरुण भोगले तर आभार मुख्याध्यापक तुकाराम गिरी यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था संचालक पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!