शंकर चव्हाण यांची शासकीय निमशासकीय कर्मचारी पतपेढी संचालकपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सहकारी बँक इतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्ग च्या संचालकपदी शंकर अंकुश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतपेढीच्या कुडाळ येथील सभागृहात शुक्रवार २ मे रोजी झालेल्या सभेत शंकर चव्हाण यांची सर्वानुमते संचालकपदी निवड करण्यात आली. यावेळी पतपेढी अध्यक्ष प्रसाद कुंटे, उपाध्यक्ष आनंद परुळेकर, संचालक दिलीप मस्के, दिनकर केळकर (संचालक) आणि सचिव रामचंद्र दळवी उपस्थित होते. पेशाने प्राथमिक शिक्षक असलेले शंकर चव्हाण हे भारत विद्यामंदिर लोरे नं. १ गाव लोरे नं. २ तालुका वैभववाडी येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी खाजगी न्यूज चॅनेल चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शंकर चव्हाण हे उत्कृष्ट कॅरमपटू असून जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी पदाधिकारी क्रीडा स्पर्धेत मागील काही वर्षे सलग प्रथम क्रमांक विजेते आहेत. विद्यार्थी आणि पालकवर्गात लोकप्रिय असलेले शंकर चव्हाण हे उपक्रमशील शिक्षक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!