रविवार ४ मे ते मंगळवार ६ मे कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : शिरवल चव्हाण वाडी येथे जय भवानी माता मंदिराचा ५ वा वर्धापन दिन सोहळा आणि त्रैवार्षिक गोंधळोत्सव रविवार ४ मे ते मंगळवार ६ मे या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिरवल चव्हाण वाडी येथील जय भवानी माता मंदिर येथे साजरा होणार आहे.
यानिमित्त जय भवानी कृपा समिती शिरवल आणि जय भवानी कृपा समिती, मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि ०४ मे रोजी
सकाळी.९ ते दुपारी १ वाजता देवी मातेकरिता लोपातर,दु १ ते २ वा.भोजन कार्यक्रम,दु ४ ते साय ७ वा.विविध खेळांच्या स्पर्धा,रात्री ८ ते ९ वा.भोजन कार्यक्रम, रात्रौ. ९ ते १ वा.बाळा सावंत दशावतारी नाटय मंडळ प्रस्तुत दशावतारी नाटक “कनक दुर्गा”
सोमवार दि ०५ मे रोजी सकाळी. ७ ते .११ वाजता.देवी मातेचा अभिषेक आणि पुजा,दु. १ ते २ वा.भोजन कार्यक्रम,दु. ४ ते सायं ७ वा.हळदी कुंकू समारंभ,रात्रौ ७ ते ८ वा.मान्यवरांचे सत्कार व बक्षीस समारंभ,रात्री ८.३० ते ९ वा.महाप्रसाद,रात्रौ ९ ते १ वा.आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना
श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ (घालवली. देवगड) बुवा अखिलेश अनंत फाळके आणि श्री महाडेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण देवगड) बुवा संदीप पुजारे यांचा आमने -सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.
मंगळवार दि ६ मे रोजी
स. ७ ते १० वा.देवी मातेचा अभिषेक आणि पूजा,स. १०.३० ते १ वा.गोंधळी यांच्या कडून देवा मातेचे पुजन,दु १ ते २ वा.महाप्रसाद,साथ ५.३० ते ७ वा.जोगवा मागणे,साय ७.३० ते ८ वाजता, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत,रात्री ८ ते ९ वा.मांड भरणे, दर्शन सोहळा व नवसफेड,रात्री ९ ते १० वा.महाप्रसाद,रात्रौ १०.३० ते सकाळी. ५ वा. देवी मातेचा जागर गोंधळ कार्यक्रम होणार आहे.
जय भवानी मातेच्या भव्य कार्यक्रमांना व त्रैवार्षिक गोंधळोत्सव सोहळयास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय भवानी कृपा समिती शिरवल आणि जय भवानी कृपा समिती, मुंबई मंडळ यांनी केले आहे.












