कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरंदळे येथील श्री ठेवणादेवी मंदिराचा 23 वा वर्धापन दिन व श्री सत्यनारायाची महापुजा मंगळवार दि. 6 मे रोजी रोजी आयाेजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत धार्मिक विधी, दुपारी 12 वा. श्री टेवणादेवीची आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती व तीर्थप्रसाद, संध्याकाळी 6 ते 8 स्थानिक भजने, रात्री 8 ते 11 महापुरुष मंडळ चुनवरे यांचे वारकरी गोपनृत्य, रात्री 11 वाजता आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना गुरुवर्य ज्ञानेश्वर मेस्त्री व प्रकाश पारकर यांचे शिष्य बुवा अखिलेश फाळके ( धालवली देवगड) विरुद्ध गुरुवर्य अजित मुळम यांचे शिष्य बुवा राजेंद्र मोंड (माेंड- देवगड यांच्यात होणार आहे
गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यवा असे आवाहन श्री ठेवणादेवी मंदिर देवस्थान तरंदळे यांनी केले आहे












