अनंत सदानंद हरयान ८४.१७ टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कोकण विभाग अंतर्गत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उद्योगश्री प्र.ल.पाटील ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स चा ९९.५७ टक्के निकाल लागला असून तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन दविस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर संपूर्ण कॉलेज मध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु.अनंत सदानंद हरयान याने ८४.१७ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला तर वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी श्रुतिका श्रीराम ठाकूरदेसाई हिने ८०.५० टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला असून यश सत्यवान पवार (विज्ञान) ७९.६७ गुण व आदित्य दशरथ जाधव (वाणिज्य) ७९.६७ या दोन्ही विद्यार्थ्यांनी संयुक्तिक तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. खारेपाटण ज्युनियर कॉलेज १२ वी बोर्ड परीक्षे करीता एकूण २६५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापेकी एकूण २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर कॉलेजचा एकूण निकाल ९९.६२ टक्के एवढा लागला असून गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे कॉलेज चे प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक – संतोष राऊत यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच शाखा निहाय गुणवंत ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे —
सायन्स विभाग – प्रथम – अनंत सदानंद हरयान – ५०५ गुण (८४.१७ % ),द्वितीय – यश सत्यवान पवार – ४७८ गुण (७९.६७ %),तृतीय -सोहम गजानन कोलते – ४७६ गुण (७९.३३ %) कॉमर्स विभाग – प्रथमकु.श्रुतिका श्रीराम ठाकूरदेसाई – ४८३ गुण (८०.५० %),द्वितीय – आदित्य दशरथ जाधव – ४७८ गुण (७९.६७ %),तृतीय – कुं.साक्षी सूर्यकांत कुडाळकर – ४७४ गुण (७९.०० % ) आर्ट्स विभाग – प्रथम – कु.सनीका सुधाकर वारिसे – ४६९ गुण (७८.१७ %),द्वितीय – कु. वेदिका रघुनाथ साईल – ४६६ गुण (७७.६७ %),तृतीय – कु.ऋतिका रत्नराज आंबेरकर – ४१६ गुण (६९.३३ %)
तर द्वीस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभाग – प्रथम – गौरव संतोष वाडेकर ४११ गुण (६८.५० %), ऑटो टेक्नॉलॉजी इंजि.विभाग – प्रथम – अनिकेत अनंत तावडे ४४९ गुण (७४.८३ %),
अकाँ.अँड ऑफिस मॅनेजमेंट- प्रथम – कु.कोमल दीपक देसाई – ४३२ गुण (७२.०० %) तरी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ सर्व संचालक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच दशक्रोषितील नागरिकांच्या वतीने कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
















