वाणिज्य शाखेची संपदा पुजारी ९३.५०% टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम
कला वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांचा निकाल १००% संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेतून एकूण २०७ विद्यार्थी एच.एस.सी. परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कला शाखेतून कु. संचित मिलिंद जाधव या विद्यार्थ्याने ७१.१७% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.प्राची दिपक पांचाळ हिने ने ७०.३३% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.प्रिती दयानंद गुरव हिने ७०.१७ % गुण प्राप्त करत कला शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेतून कु.संपदा यशवंत पुजारी या विद्यार्थीनीने ९३.५०% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.श्रेया देवजी पालकर हिने ९१.१७ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर कु.तनिष्का प्रशांत तावडे हिने ८४.६७% गुण मिळवत वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विज्ञान शाखेतून कु.मानसी मुकुंद शिनगारे या विद्यार्थीनीने ८६.००% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.प्राची औदुंबर तळेकर हीने ८४.१७ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.साक्षी प्रविण भोसले हिने ८३.८३% गुण प्राप्त करत विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे व मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













