भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन – समीर नलावडे
कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी 12 मे रोजी कणकवली शहरात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे करणार आहेत. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आपण समस्त कणकवलीवासीय भारतीय लष्करासोबत आहोत हा संदेश दिला जाणार आहे. या तिरंगा यात्रेत कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक वर्ग, रोटरी सदस्य , डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थी यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.तिरंगा यात्रा सकाळी ८.०० वाजता पटकी देवी मार्गे निघून तहसीलदार ऑफिस कडे यात्रेची सांगता होईल.