शाळा कॉलेज विद्यार्थिनिंसाठी केरळा स्टोरी 2 पिक्चरचे कणकवलीत मोफत आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : लव्ह जिहाद आणि त्यातून होणाऱ्या धर्मांतरच्या अतिगंभीर समस्येबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर तसेच सिनिअर कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माध्यमिक शाळा व कॉलेज मधील मुलींसाठी केरळा स्टोरी 2 या चित्रपटाचा मोफत शो 7 मार्च पासून लक्ष्मी चित्रमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. हिंदधर्मीय मुलींना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याचा लव्ह जिहाद अलीकडच्या काळात फोफावला आहे. लव्ह जिहाद च्या बळी ठरलेल्या हिंदू मुलींच्या आयुष्याची धर्मांतरा नंतर कशी फरफट होते हे केरळा स्टोरी 2 या सिनेमात दाखविण्यात आले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हिंदू धर्मीय मुलींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार भाजपा कणकवली तालुकाच्या वतीने केरळा स्टोरी 2 सिनेमा किशोरवयीन मुली ज्युनिअर कॉलेज तसे सिनिअर कॉलेज मधील मुलींना मोफत दाखविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता विशेष शोचे आयोजन कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिर मध्ये करण्यात आले आहे. शनिवार 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता दाखविण्यात येणारा केरळा स्टोरी 2 सिनेमा शो हाऊसफुल झाला असून त्यानंतरही मुलींना हा सिनेमा लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे मोफत दाखविण्यात येणार आहे. ज्या मुलींना युवतींना केरळात स्टोरी 2 सिनेमा मोफत पाहायचा असेल त्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री मोबा. 9577654565 / भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे मोबा. 9422381900 / नगरसेविका मेघा गांगण मोबा.9152120512 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











