कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवार ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे असेल. मुंबईहून दुपारी २.३० वाजता मोपा विमानतळ येथे आगमन होईल. तेथून ते कणकवली कडे प्रयाण करतील. संध्याकाळी ४ वाजता कणकवली तहसीलदार कार्यालय येथे आयोजित केलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज, महाराजस्व व समाधान शिबीर अभियान टप्पा – १ च्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. असा त्यांचा दौरा आहे.
पालकमंत्री नाम. नितेश राणे ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर; जनतेच्या घेणार भेटी











