नरडवे माजी ग्रामपंचायत सदस्य मीना सावंत यांचे आकस्मिक निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे टेमकरवाडी येथील मीना मोहन सावंत (वय ७४ वर्ष) यांचे मंगळवार ३ मार्च रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले. नरडवे ग्रामपंचायत सदस्य तसेच कणकवली पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले होते. नरडवे इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक कै. मोहन सावंत यांच्या त्या पत्नी होत. जांभवडे हायस्कूलचे शिक्षक उमेश सावंत, अभिषेक मेडिकल जोगेश्वरीचे फार्मासिस्ट योगेश सावंत आणि वकील प्रतिभा सावंत यांच्या त्या आई होत्या. नरडवे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नरडवे ग्रामोद्धार संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!