खारेपाटण (प्रतिनिधी) :श्री केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने शनिवार दी.१० मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मिनी शूटिंग हॉलीबॉल नाईट स्पर्धेत तळेरे हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून १ बोकड व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.तर उपविजेता खारेपाटण या संघाला देखील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून १ बोकड व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
खारेपाटण केदारेश्वर मंदिर येथील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मिनी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घघाटन सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव व श्री संकेत शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,खारेपाटण सोसायटीचे संचालक श्री विजय देसाई,खारेपाटण माजी सरपंच श्री वीरेंद्र चिके,ग्रा.पं.विजय देसाई,युवा कार्यकर्ते तेजस राऊत,गोल्डन फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते श्री सुरेश गुरव, ग्रामस्थ श्री प्रकाश मोहिरे,केदारेश्वर मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विठ्ठल गुरव,श्री सुरेश गुरव,अमोल गुरव,निलेश गुरव,सुमित साटविलकर,आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
्या स्पर्धेकरीता रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील नामवंत २० संघ दाखल झाले होते.अंतिम विजेता संघाना खारेपाटण माजी सरपंच श्री वीरेंद्र चिके यांच्या शुभहस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी केले.