कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी गोशाळेचे ठेकेदार त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे मालक रघुनाथ नाईक यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार राणे यांच्या मनातील गोवर्धन गोशाळा प्रतायक्षात उतरविण्यासाठी ठेकेदार रघुनाथ नाईक यांनी अथक मेहनत घेतली आहे. खासदार राणे यांना अभिप्रेत असलेले सर्व मनोवेधक आणि दर्जेदार बांधकाम रघुनाथ नाईक यांनी अल्पावधीत पूर्ण केले. रघुनाथ नाईक यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करंजे येथील गोवर्धन गोशाळा उदघाटन प्रसंगी जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, माजी मंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजेंद्र साळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रघुनाथ नाईक यांचा सत्कार
