वैभववाडी तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थीनींचा दुसऱ्या शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुका भाजपाच्या वतीने आयोजित लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे मोफत दाखविण्यात आलेल्या केरळा स्टोरी 2 या सिनेमाच्या दुसऱ्या शोला कॉलेज युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभत आहे. लव्ह जिहाद सारख्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात हिंदू धर्मीय युवतींनी फसू नये यासाठी हिंदुयुवा नेते नामदार नीतेश राणे हे संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच आवाज उठवत असतात. जिथे जिथे लव्ह जिहाद सारख्या घटना घडतात तिथे स्वतः जाऊन संकटग्रस्त भगिनींना मदतीचा आणि सहकार्याचा हात देऊन त्याना सावरण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न मंत्री नितेश राणे करताना दिसून येतात. केरळा स्टोरी 2 सिनेमात ही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदू मुलींच्या आयुष्याची फरफट कशी झाली आहे हे दर्शविले आहे. या घटनांतून बोध घेऊन आपण स्वतःचे हित जपले पाहिजे. लव्ह जिहाद सारख्या घटनांचे आपण बळी पडू नये म्हणून आपल्या मतदारसंघातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकणाऱ्या किशोरवयीन मुली तसेच कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व किशोरवयीन मुलींना हा चित्रपट मोफत पहाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने केरळा स्टोरी 2 सिनेमा वैभववाडी तालुक्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींना मोफत दाखविण्यात आला. या संकल्पनेतील दुसऱ्या मोफत शोचा शुभारंभ शनिवार ७ मार्च रोजी सकाळी करण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ वाजता दुसऱ्या शोला वैभववाडी तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला.
यावेळी भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्षा प्राची तावडे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, जि. प. सदस्या श्रावणी रावराणे, पं. स. सदस्या सुवर्णा संसारे, माजी जि. प. सभापती शारदा कांबळे, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, वैभववाडी तालुक्यातील शाळांचे शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











