उपविजेता अनुरी वॉरियर्स संघ
कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधूगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच संघांनी सहभाग घेतला होता. तनोज मालंडकर यांच्या ओम साई स्पोर्ट्स संघाने चैतन्य निग्रे याच्या नेतृत्वाखाली सिंधुगर्जना चषक २०२५ वर आपले नाव कोरले व अनुजा ऋषिकेश भिसे यांचा अनुरी वॉरियर्स संघ प्रज्ञेश निग्रे याच्या नेतृत्वाखाली उपविजेता ठरला.ही क्रिकेट स्पर्धा ब्राम्हणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानात झाली. या स्पर्धेत सर्व खेळाडू हे सिंधुगर्जना पथकातील वादक होते, प्रत्येक संघात मुलींचा समावेश देखील होता. रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघमालक कृष्णराज सातवसे, स्वयंभू रवळनाथ संघमालक जोगेश राणे, ओम साई स्पोर्ट्स संघमालक तनोज मालंडकर,अनुरी वॉरियर्स संघमालक अनुजा भिसे, डी. एस. स्वराज संघमालक सुमंगल सावंत यांचे संघ होते. आयपीएल प्रमाणेच लिलाव प्रक्रियेने सर्व खेळाडूंची निवड ही संघामध्ये करण्यात आली.
शनिवार व रविवार २ दिवस ही स्पर्धा खेळवण्यात आली. सिंधुगर्जना चषक २०२५चा अंतिम सामना अनुरी वॉरियर्स विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स या संघामध्ये रंगला. १३ रंगतदार सामन्यातून ओम साई स्पोर्ट्स संघ सरस ठरला. चैतन्य निग्रे याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर मुलांमध्ये उत्कृष्ट फलंदाज प्रज्ञेश निग्रे व उत्कृष्ट गोलंदाज तेजस चव्हाण, मुलींमध्ये उत्कृष्ट फलंदाज नेहा भोसले आणि उत्कृष्ट गोलंदाज दिव्या कुऱ्हाडे यांना गौरविण्यात आले. यावेळी गुढीपाडवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रातील वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना देखील गौरविण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी येंडे, द्वितीय क्रमांक सुमन सोनम, तृतीय क्रमांक मिनल साबळे, उत्तेजनार्थ नेहा भोसले व दिव्या कुऱ्हाडे
सिंधुगर्जना चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समाजसेवक श्री. संजय मालंडकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.भगवान लोके, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य श्री.लक्ष्मीकांत भावे, रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघमालक श्री.कृष्णराज सातवसे, सिंधुगर्जनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.हरीभाऊ भिसे, अध्यक्षा सौ. सुरेखा भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, ओम साई स्पोर्ट्स संघाचे संघमालक तनोज मालंडकर, श्री.कल्पेश महाडेश्वर, अनुजा ऋषिकेश भिसे यांच्या अनुरी स्पोर्ट्स संघातर्फे तुषार म्हापसेकर, शुभम पवार, अनंत सरंगले, श्री.जोगेश राणे यांच्या स्वयंभू रवळनाथ संघातर्फे कुणाल राणे.
सर्व वादकांचे त्यांच्या कार्याबद्दल मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले, सिंधुगर्जना पथक गेली पाच वर्षे वाद्यवादनातून आपली कला जोपासत इतर उपक्रम देखील राबवून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. यावेळी जयवंत सातवसे, पथकप्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला उपप्रमुख मिनल साबळे व पथकातील सर्व पदाधिकारी तसेच खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून वैभव म्हापसेकर, रोहित म्हापसेकर, तन्मय सरुडकर व सिद्धिविनायक पारगावकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.












