बकासुर असणार खास आकर्षण
राकेश परब मित्रमंडळाचे आयोजन
पोईप (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे शनिवार, २ मे रोजी दुपारी २ वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेत राज्यभरातील बैलगाडा स्पर्धक सहभागी होणार असून बकासुर बैल हा खास आकर्षण असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शर्यतीत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी तब्बल ३५,००० रुपये व मानाची ढाल, द्वितीय क्रमांकासाठी २५,००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी २०,००० रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी १७,००० रुपये व मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत. याशिवाय पाचव्या ते पंधराव्या क्रमांकापर्यंतही रोख पारितोषिके व मानाच्या ढालींचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून ‘झोकदार झकास’ बैलगाड्यांची रंगतदार झुंज पाहायला मिळणार असून, बैलगाडा प्रेमींसाठी हा एक मोठा पर्वणीचा दिवस ठरणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे.












