कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात दुपारी ३ वाजता सत्यनारायणाची महापूजा, आरती व तीर्थप्रसादाने होईल. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता निमंत्रित भजनांचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर रात्री १०.३० वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमासाठी श्री लिंगेश्वर मित्रमंडळ व ग्रामस्थ, कलमठ गावडेवाडी यांनी भाविकांना आग्रहाचे निमंत्रण दिले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











