चौफेर व्यक्तिमत्व हरपले
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत तसेच प्रतिष्ठित ज्येष्ठ किराणा मालाचे घाऊक व्यापारी असलेले रमेश भोगटे (६२) यांचे औषधोपचार दरम्यान दुःखद निधन झाले. ते साईमंदिराचे सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे माजी संचालक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.बालगोपाल मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच राधाकृष्ण मित्रमंडळाचे संचालक म्हणूनही त्यांची ओळख होती. धार्मिक वृत्ती आणि वारकरी संप्रदायातील सक्रिय वावर लक्षणीय होती. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची आठवण सदैव राहील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ओंकार, मुलगी, सुन, जावई, नातू, भाऊ – बहिणी असा मोठा परिवार आहे. अंत्ययात्रेत सर्वस्तरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.वैकुंठभूमीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.












