सर्जन डॉ. अनिल नेरुरकर यांच्याकडून आयडियल स्पेशल स्कूलला स्कूल बस हस्तांतरित

कणकवली (प्रतिनिधी) : अमेरिकेतील नामांकित सर्जन डॉ. अनिल नेरुरकर यांनी आयडियल स्पेशल स्कूल वरवडे या शाळेसाठी नुकतीच स्कूल बस घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले व आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी हस्तांतर केली. आपल्या डॉक्टर पेशासोबतच सामाजिक क्षेत्रातही कायमच कार्यरत असणारे डॉ. नेरुरकर नेहमीच आयडियल इंग्लिश स्कूलसाठी हातभार लावतात. या बस हस्तांतरण प्रसंगी डॉ. अनिल नेरुरकर, ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई, स्पेशल स्कूल च्या केंद्रप्रमुख मंजिरी घेवारी, पुरुषोत्तम पाताडे, मीना शिंगाडे, विठू प्रभू , राजू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!