कणकवली आर. एफ. ओ. सुहास पाटील यांच्या वनपथकांची धडाकेबाज कामगिरी
तळेबाजार (प्रतिनिधी) : दिनांक 30/04/2026 रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना मौजे तळेबाजार तालूका देवगड येथे ब्लू व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी अज्ञात इसम येणार असल्याबाबत मिळालेल्या गुप्त् माहितीनुसार सहायक वनसंरक्षक खा. कु. तो. व वन्यजीव सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कणकवली व अधिनस्त कर्मचारी यांचे समवेत बनावट ग्राहक तयार करून अंबर ग्रीस खरेदी करण्यासाठी मौजे तळेबाजार येथे पाठवण्यात आले असता ३ अज्ञात इसम यांनी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्री करण्यासाठी आले असता सापळा रचून एकूण ३ आरोपी यांना रंगेहात मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांच्यावर देवगड राऊंड गुन्हा क्र.WL०१/२०२७नुसार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम 9, 39, 44, 49, 49(B), 51, अन्वये दिनांक. 30/04/2026 प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला.
सदर गुन्हयामधिल सामिल आरोपींची नावे 1. योगेश गणपत करंजेकर, वयः 42 रा.इळये, ता. देवगड जि. सिंधुदूर्ग 2. विष्णु धाकू धुरत वय 33, रा. आनंदवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, 3. संतोष काशीराम नाडणकर वय : 56 रा. बरेली, ता. देवगड जि. सिंधुदूर्ग, ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 8.800 कि.ग्रॅ. वजनाची अंदाजे किंमत 8 कोटी रकमेची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) हस्तगत करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई हि मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा यांचे मार्गदर्शनाखली, मा. सहा. वनसंरक्षक तथा (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी डॉ. एस्. के. लाड, यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली एस्. एस्. पाटील, वनपाल मठ सावळा कांबळे, वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील, वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, गौरेश राणे पोलीस हवालदार, वनरक्षक मिठबाव आप्पासो राठोड, वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे, वनरक्षक दिगवळे, प्रतिराज शिंदे, सागर भोजने, संग्राम पाटील, व अनिल गावडे, मंदार नाईक चालक यांचेमार्फत करण्यात आली. सदर गुन्हयाबाबत अन्य काही माहिती असलेस वनविभाग सावंतवाडी यांना देण्यात यावी. सदर व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.












