शिबिर अभियान केवळ उपक्रम नाही तर समाजाच्या प्रगतीचे महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी पाऊल – विजय सहारे
फोंडाघाट (प्रतिनिधी) : जिथे शासन आणि समाज एकत्र येतो, तिथे विकासाची नवी पहाट उगवते – या ध्येयातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व एकदिवसीय समाधान शिबिर फोंडाघाट येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, कणकवली तालुका महसूल नायब तहसीलदार मुकुंद मंडले, जिल्हा परिषद सदस्य राजन चीके, मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य मानसी मराठे,फोंडा सरपंच संजना आग्रे, समृद्धी नर,तन्वी मोदी, संजना हळदिवे, सहाय्यक महसूल अधिकारी एस एन खाडे, इ .मान्यवर उपस्थित होते.
शुभारंभ मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मंडल अधिकारी प्रवीण मोंडे यांनी पुष्परोप देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रिया शिंदे यांनी तर सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. यावेळी सोसायटी चेअरमन राजन नानचे, संजय रावले, गणेश शिंदे अमृता भुसके पांडुरंग शिंदे सुधीर धुरी, राजा शिरोडकर, भाई भालेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जि. प. सदस्य राजन चीके, मनोज रावराणे, संजना आग्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवीत असते. या योजनांचा उद्देश केवळ सुविधा देणे नाही तर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विकासाची किरणे पोचविणे हा आहे. राज्य शासनाच्या महसूल विभाग व महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम प्रत्येक महसूल मंडळामध्ये राबविला जात आहे. याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असेही आवाहन केले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले – सातबारा, आठ अ, शिधापत्रिका, फेरफार, जन्मतारीख दाखले इत्यादींचे वाटप करण्यात आले. ग्राम महसूल अधिकारी करंजे गोजिरी गोरे यांनीही या उपक्रमाची उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फोंडा ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस यांनी केले. या कार्यक्रमाला ग्राम महसूल अधिकारी अमृता भूसके, गणेश शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी, तसेच लाभार्थी, ग्रामस्थ, महसूल- कृषी विभाग, आरोग्य विभाग, दुय्यम निबंधक विभाग, भूमी अभिलेख विभाग, तसेच महसूल विभाग यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….












