धार्मिक कार्यक्रमासह विविध उपक्रमांचे आयोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : बावीचेभाटले येथील कासार समाजाचे आराध्य, श्री कालिकादेवी मंदिराचा वर्धापन दिन, श्री कालिका देवी उत्कर्ष सेवा मंडळ,मुंबई व बावीचेबाटले यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १४ मे २५ रोजी उत्सव सोहळा आयोजित केला आहे..
त्यानिमित्ताने १३ मे रोजी सोहळ्याचा शुभारंभ दिपप्रज्वलनाने आणि त्यानंतर विविध स्पर्धांचे आयोजन ! मुख्य कार्यक्रम बुधवार १४ मे रोजी– सकाळी नऊ वाजता श्री कालिकादेवीवर अभिषेक व पूजा अर्चा,त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती आणि महाप्रसाद ! दुपारपासून श्रीदेवीची ओटी भरणे, संध्याकाळी महिलांसाठी हळदीकुंकु ! सायंकाळी पाच वाजता बुवा ज्ञानेश्वर येंडे यांचे सुस्वर भजन ! सायंकाळी सात वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत, बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा !आणि पाहुण्यांचे मार्गदर्शन ! रात्री दहा वाजता, श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ- पियाळी यांचा चक्रीभजनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.या उत्सव सोहळ्याला श्रेया राजन तीवरेकर यांचे महाप्रसादासाठी प्रायोजकत्व लाभले आहे.
या कार्यक्रमाला पंचक्रोशी तील सर्व भाविकांनी उपस्थित राहून, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन तुकाराम तीवरेकर व विठोबा येंडे अध्यक्ष- कमिटी यांनी केले आहे. यापूर्वी श्रीकृष्ण येंडे यांच्या सहकार्यातून सद्गुरु श्रीशिवकृपानंद स्वामी यांचा ध्यानयोग शिबिराचा कार्यक्रम 12 मे रोजी पार पडला…..












