कळसुली हायस्कूलची SSC बोर्ड परीक्षेची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा आपली १००% निकालाची परंपरा कायम राखत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) मार्च २०२५ चा १००% निकाल लागला आहे. सदर परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण ४७ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यात प्रशालेतून प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक – कु. रतन रणजित सुतार – ९३.४०%,
द्वितीय क्रमांक – कु. कुणाल रमेश वायंगणकर – ९३.००%,
तृतीय क्रमांक – कु. पायल विनोद कदम – ९०.००%.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम सदाशिव दळवी, कार्याध्यक्ष – सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस – विजय पांडुरंग सावंत, सल्लागार – प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – नामदेव घाडीगावकर, सदस्य – रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या – शुभदा देसाई व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष – बाबाजी मुरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – शिवाजी गुरव, मुख्याध्यापक – व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!