कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कडून आज नूतन जिल्हाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली प्रभाकर सावंत यांनी 27/28 वर्षांपूर्वी भाजपा युवा मोर्चा पासून कामाची सुरवात केली यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, पत्नी पंचायत समिती सदस्य त्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस, संघटण सरचिटणीस ही पदे त्यांनी भूषविली व 2023 मध्ये सिंधुदुर्ग भाजपा चे अध्यक्ष झाले गेली 2 वर्षे कुशलपणे संघटना हाताळली या कार्यकाळात नवीन जुने भेदभाव न ठेवता सर्व कार्यकर्त्यांनचा सन्मान राखण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला, तसेच सर्व नेत्यांमधील दुवा बनून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम केलेच परंतु समाजातील कि वोटर्स म्हणजेच डॉक्टर, वकील, साहित्यिक, विविध संस्था पदाधिकारी यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले त्यामुळे लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदारसंघ या निवडणुकामध्ये भाजपा ला भरभरून यश मिळाले व सर्वांच्या मदतीने संघटना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली यात आपण सगळं केले हा अविर्भाव कुठेही नव्हता
आज भाजपा प्रदेश कडून जाहीर झालेल्या जिल्हाध्यक्ष यादी मध्ये त्यांना परत एकदा संधी देण्यात आली आगामी काळात जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुका असून सन्मानीय नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार नारायण राणे, रविंद्र चव्हाण,पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बॅंक उपाध्यक्षअतुल कळसेकर,माजी आमदार अजित गोगटे,माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शना खाली व सर्व सहकाऱ्यानंच्या मदतीने भाजपाला शतप्रतीशत यश मिळवून देतील यात अजिबात शंका नाही भारतीय जनता पार्टी मध्ये जिल्हाध्यक्षपदी परत संधी मिळणे हे तितकेच महत्वाचे आहे पुन्हा एकदा त्यानां जिल्हाध्यक्ष पदी संधी मिळाली याबद्दल त्यांचे अभिनंदन












