हेत किंजळीचा माळ येथील धरणग्रस्तांनी धरणाचे काम बंद पाडले

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणतील पिण्याच्या पाण्यासह अन्य प्रलंबित मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त धरणग्रस्थानी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळपासून धरणाच्या  दरवाज्याचे सुरु असलेले काम बंद पाडले आहे.     अरुणा धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आखवणे, भोम गावातील  धरणग्रस्तांपैकी आखवणे येथील सुमारे १६५ धरणग्रस्तांचे हेतकिजळीचा माळ येथे २०१९ साली पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र सहा वर्षे होऊनही पुनर्वसन गावठाणातील पाण्यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अगदी  पाण्यासारख्या मूलभूत प्रश्न सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. गेली पाच सहा वर्षे येथील धरणग्रस्थ आपल्या प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून मिळणाऱ्या पोकळ आश्वासनामुळे धरणग्रस्थामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.    

पुनर्वसन गावाठाणाला पिण्याच्या पाण्याची विहीर दयावी. ज्या पात्र लाभार्त्यांना अद्याप निवासी भूखंड मिळाला नाही. त्यांना भूखंड मिळावा. भूखंडाचा सात बारा मिळावा. अशा मागण्या करण्यात येत आहेत. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप करीत ग्रामस्थांनी सोमवारी धरणाच्या दरवाज्याचे सुरु असलेले काम बंद पाडले आहे.सध्या धरणातील पाणी साठा कमी करून धरणाच्या दरवाजाचे अंतिम काम सुरु आहे. हे काम झाले की धरणाचे काम पूर्ण होणार आहे.त्यानंतर प्रसासन आपल्याला दाद देणार नाही. अशी भावना धरणग्रस्थाकडून व्यक्त केली जात आहे.  यावेळी माजी सरपंच सुरेश नागप, सुनील नागप, महादेव नागप, शिवाजी पडिलकर, मानाजी घाग, विजय नागप यांच्यासह किंजळीचा माळ येथील धरणग्रस्त उपस्थित होते. दरम्यान सायंकाळी पाटबंधारे विभाग उपअभियंता अभय मगरे यांनी धरणग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली. आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच तुमचे प्रश्न मागे लागतील असे धरणग्रस्तांना सांगितले. मात्र जोपर्यंत प्राधान्याने पुनर्वसन गावठाणातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत आम्ही धरणाच्या दरवाजाचे काम करू देणार नाही. अशी आक्रमक भूमिका धरणग्रस्थानी घेतली. त्यामुळे या चर्चेतून मार्ग निघाला नाही. चौकट…    

पुनर्वसन गावठाणात १६५ पेक्षा जास्त कुटुंबाचे  पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे या गावाठाणाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा. अशी मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!