श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयला पाच हजाराची देणगी
आचरा (प्रतिनिधी) : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्वेता प्रविण आंबेरकर(आरे) यांच्यावतीने आपली आई कै. सुनिता गोपिनाथ आडारकर पूर्वाश्रमीच्या कै. सुलोचना अच्युत पडवळ व वडील गोपिनाथ वासुदेव आडारकर यांच्या स्मरणार्थ श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयला पाच हजाराची देणगी देण्यात आली. श्वेता आंबेरकर यांनी ग्रंथपाल सौ. स्वरा पालकर यांच्या कडे पाच हजार रुपयाचा धनादेश आज सुपूर्द केला. यावेळी खजिनदार देवेंद्र हडकर, कार्यकारीणी सदस्य महेंद्र मधुकर मांजरेकर, विवेक परब, संतोष गांवकर आदी उपस्थित होते.












