तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे -पियाळीमार्गे फोंडा हा रस्ता गेली अनेक वर्ष नुसता डागडुजी केला जातो त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर असंख्य खड्ड्यांचे जाळे पसरलेले आहे.याशिवाय या रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने संपुर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटकरण किंवा मजबूत डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते आशुतोष जगदीश मुंडले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अशितोष मुंडले यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हणाले आहेत की,तळेरे पियाळी मार्गे फोंडा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. हा रस्त्या वाहतूकीयोग्य राहिलेला नाही.सदरच्या रस्त्याची आपल्या स्तरावरून लवकरात लवकर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.गेल्या वर्षी याच रस्त्यावरील खड्डे जांभा दगड टाकून भरून काढले होते.आपल्या कार्यालयाकडून पाठवलेल्या पत्रानुसार यावरती कोणताही प्रकारची गांभीर्याने कारवाई झाल्याची दिसत नाही आपण जुलै 2024 अर्थसंकल्प अंतर्गत काम मंजूर असून विहित निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काम हाती घेण्यात येईल असे दिलेल्या पत्रात नमूद होते परंतु या सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था पाहता फार वाईट आहे या रस्त्यावरून जाणे वाहनधारकांना धोक्याचे झाले आहे.या निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री यांनाही पाठवली आहेत.





















