सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असताना त्याची जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी होत नाही. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. अपहार करणाऱ्या ग्रामसेवकांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आज निरवडे येथील श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हा परिषद भवन समोर भिक मागो आंदोलन छेडले.
ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची केंद्रबिंदू आहे असे असताना गावचा विकास करणे ही ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. तरी अनेक ग्रामसेवक कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे जनतेची कामे गतीने होत नाहीत. नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे. यासाठी शासन आदेशानुसार ग्रामसेवकांना व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकरक करावे. अशी मागणी गेले वर्षभर सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन त्यांचे लक्ष वेधले तसेच आंदोलनही केले तरीही अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी श्रीमती गावडे यांनी आज जिल्हा परिषदेसमोर भीक मागे आंदोलन केले तसेच जे ग्रामसेवक बायोमेट्रिक हजेरीचा वापर करत नाहीत तसेच अपहरण करणाऱ्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात कसूर करणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी निरवडे येथील श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज भीक मागो आंदोलन केले.












