फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी जि. प. सीईओ माणिकदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी

ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार करण्यात आले वितरित

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती जि. प. सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार स्वाती सूर्यकांत फोंडके व राजश्री राधाकृष्ण भिसे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुजाता हळदीवे, विस्तार अधिकारी शिंदे,विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, ग्राप सदस्य सुभाष सावंत, प्राची धुरी, माजी ग्राप सदस्य विश्वनाथ जाधव, गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!