तळेरे (प्रतिनिधी) : इतिहासाच्या सुवर्णपानांवर आपली छाप उमटवणाऱ्या,धर्म, नीती, समाजसेवा आणि प्रशासन या सर्वच क्षेत्रांत विलक्षण कर्तृत्व दाखवणाऱ्या पुण्यश्लोक,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ता.कणकवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्ती शिक्षिका सौ.रजनी कासार्डेकर यांच्या हस्ते राजमाता- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर,स्कूल कमिटी पदाधिकारी दिलीप शेलार,सुभाष पाताडे,माजी सैनिक व पदाधिकारी रवींद्र पाताडे,सेवानिवृत्त प्राचार्य एम.डी.खाड्ये,प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे व विद्यालयाचे शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांनी करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकून अभिवादन केले.












