पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची सिंधुदुर्गात बदली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अतुल माधवराव जाधव यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली आहे. अतुल जाधव यांनी यापूर्वी वैभववाडी पोलीस ठाणे, वेंगुर्ले पोलीस ठाणे प्रभारी पद उत्तम रित्या सांभाळले होते. तसेच सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे. लोकसभा निवडणूक आधी झालेल्या प्रशासकीय बदलीमध्ये अतुल जाधव यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली होती. त्यांनतर आता पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची बदली झाली आहे. सर्वसामान्य जनतेशी अत्यंत चांगले संबंध ठेवतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात वाकबगार आणि गुन्ह्यांची उकल करण्यात माहीर असलेला पोलीस अधिकारी म्हणून अतुल जाधव यांची पोलीस दलात ओळख आहे.

error: Content is protected !!