राणेंचा निष्ठावान कार्यकर्ता अरीफशेठ बगदादी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : तुमची ओळख जन्माने नाही तर तुम्ही केलेल्या कर्माने होते असे म्हटले जाते. जाती धर्माच्या भिंतींच्या पल्याड जाऊन आपल्या कर्तृत्वाने सर्वधर्मसमभाव चा मानवतेचा वसा आपल्या सामाजिक कार्यातून जोपासणारे आणि विजयदुर्ग दशक्रोशीत सामाजिक , आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणारे अग्रणी व्यक्तिमत्व म्हणजे अरीफशेठ जैनुद्दीन बगदादी होय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव घेतले की आपोआप राणेंचा सिंधुदुर्ग असे अवघ्या महाराष्ट्रात म्हटले जाते. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे आणि तरुण तडफदार मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार , राणेंचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अरीफशेठ बगदादी ओळखले जातात. 1 जून हा आरीफभाईंचा वाढदिवस. आपले वडील जैनुद्दीनशेठ बगदादी यांचा समाजसेवेचा वसा पुढे चालवताना त्याला राजकारणाची जोड देत अरीफशेठ यांनी 1981 पासून युवक राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात केली. आपल्या उपजत नेतृत्वगुणांमुळे अल्पावधीतच अरीफभाईंनी राजकरणात आपली पकड मजबूत केली.देवगड पंचायत समिती सदस्यपदी निवडून आलेल्या अरीफभाईंनी देवगड पंचायत समिती चे उपसभापतीपद यशस्वीपणे सांभाळले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या अरिफभाईंच्या गळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची माळ पडली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष म्हणून अरीफभाईंची कारकीर्द लक्षवेधी आणि उजवी ठरली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यापासून अरीफभाई हे राणेंचे अत्यंत विश्वासू साथीदार बनले. राष्ट्रीय काँग्रेस ,स्वाभिमान आणि आता भाजपा या राणे कुटुंबियांच्या राजकीय प्रवासात अरीफभाई यांची राणे कुटुंबीयांचा निष्ठावान कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली आहे. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या राजकीय जीवनातील आमदारकीच्या हॅट्ट्रिक मधील तिन्ही टर्म मध्ये अरीफभाईंनी नितेशजीना नेहमीच भक्कम साथ दिली. त्यामुळेच वडील नारायणराव यांच्याप्रमाणेच नामदार नितेश राणेंचेही अरीफभाई विश्वासू शिलेदार बनले आहेत. सुप्रसिडदग आंबा बागायतदार असलेल्या अरीफभाईंनी राजकीय पटलावर कार्यरत राहतानाच आरोग्य, सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान ट्रस्ट च्या माध्यमातून अरीफभाईंनी विजयदुर्ग दशक्रोशीसह सिंधुदुर्ग लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेक गरजू आणि आर्थिक दुर्बल असलेल्या गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांच्या एक दोन नव्हे तर 10 लाखाहून अधिक खर्चिक असलेल्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करून दिल्या आहेत. कॅन्सर, हृदयविकार, मणक्याचे आजार, किडनी, आदी आजारांनी त्रस्त असलेल्या कित्येकांना अरीफभाईंनी राणे कुटुंबियांच्या स्वाभिमान ट्रस्ट मार्फत मुंबईतील ख्यातनाम हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खरवंग असलेली ऑपरेशन्स अगदी मोफत करवून दिली आहेत. या गरजू रुग्णांना मुंबईत जाण्या-येण्यासाठी प्रवासखर्च, त्यांच्या ऑपरेशनसाठी लागणारी कागदपत्रे,दाखले गोळा करण्यासाठीची धावपळ अरीफभाई स्वतः करतात. दान केल्याने माणसाची आणखी बरकत होते या तत्वावर बगदादी कुटुंबांची पूर्वापार श्रद्धा आहे.बगदादी कुटुंबाच्या मानवतावादी श्रद्धेचा पाईक असलेल्या अरीफशेठ बगदादी याना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

error: Content is protected !!