कासार्डे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका रजनी आनंद कासार्डेकर या नियत वयोमनानुसार 31 मे 2025 रोजी तब्बल 40 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्त झाल्या आहेत.सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा कासार्डे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने सोन्याची अंगठी,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला.तर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दिलीप शेलार यांनी सौ.कासार्डेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबई संस्थेचे सहसचिव आनंद कासार्डेकर, स्कूल कमिटी पदाधिकारी दिलीप शेलार,सुभाष पाताडे माजी सैनिक व पदाधिकारी रवींद्र पाताडे, सेवानिवृत्त प्राचार्य एम.डी.खाड्ये,विद्यालयाच्या प्राचार्या बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे आणि सत्कारमूर्ती रजनी कासार्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आनंद कासार्डेकर,सुभाष पाताडे,दिलीप शेलार,एम.डी.खाड्ये, प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे,एस.व्ही.राणे आदी मान्यवरांनी तर पी.जे.काळे श्रीम.लतिका मिठबांवकर, दत्तात्रय मारकड, सुनिता कांबळे, अनंत काणेकर,सौ.विधी मुद्राळे,सोनाली पेडणेकर आदींनी सत्कारमूर्ती रजनी कासार्डेकर यांच्या सेवेचा आढावा घेऊन अनेक आठवणींना उजाळा दिला आणि सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्रीम.आर.ए.कासार्डेकर म्हणाल्या की, जवळपास 40 वर्षे शिक्षिका म्हणून सेवा करण्याची मला संधी मिळाली,हे पवित्र कार्य करताना अनेक संस्कारक्षम पिढ्या घडविण्याचे कार्य हातून घडले खरोखरच मला जीवन सार्थकी लागल्याचे समाधान होते असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढून सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची प्रांजळपणे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांनी तर आभार पी.जे. काळे यांनी मानले.











