पंचायत समिती आवारात जागतिक पर्यावरण दिनी एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण
कणकवली (प्रतिनिधी) : निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण आणि संवर्धन केल्यास आपोआप पर्यावरण रक्षण होईल असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत कणकवली पंचायत समिती आवारात आज माजी सभापती मनोज रावराणे , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी रावराणे बोलत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, ग्रामीण पाणीपुरवठा उपभियंता घेवडे, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रमोद ठाकूर, संजय कवटकर,कैलास राऊत, प्रथम जाधव, रामचंद्र नारकर, विशाल शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.












