खारेपाटण ग्रा पं.ग्रामविकास अधिकारी गोविंद वेंगुर्लेकर यांचा सदिच्छा समारंभ संपन्न….

झराप, कुडाळ येथे प्रशासकीय बदली

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी गोविंद सी वेंगुर्लेकर यांची नुकतीच कुडाळ झराप येथे प्रशासकीय बदली झाली असून त्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच महेंद्र गुरव, माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले, जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, अमिषा गुरव, दक्षता सुतार, धनश्री ढेकणे, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी जागृती पोटले, खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रणय गुरसाळे, कृषी सेवक सागर चव्हाण, ग्रामस्थ देवानंद ईसवलकर, ग्रा.पं.कर्मचारी उमेश राऊत, अजय तेली, अनिकेत गुरव, संगीता गुरसाळे, तृप्ती तेली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी वेंगुर्लेकर हे सन २०१६ साली खारेपाटण ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून हजर झाले व त्यांनी गेली ८ वर्षे खारेपाटण ग्रामपंचायती मध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून काम केले या कालावधीत गावात शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.तसेच शासनाच्या १०० टक्के योजनांची अमबजावणी करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत.तसेच जास्तीत जास्त शासकीय घरकुल लाभार्थीना मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याबरोबरच ग्रामपंचायतीला तालुकास्तरावरील संत गाडगेबाबा महाराज स्वच्छ्ता पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कोरोना काळात खारेपाटण ग्रामपंचायतीचे जिल्ह्यात आदर्शवत काम करत परिस्थितीला धैर्याने समोरे जात नागरिकांना धीर दिला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना ग्रामविकास अधिकारी वेंगुर्लेकर म्हणाले खारेपाटण गावात काम करत असताना येथील ग्रमस्थांचे मिळालेले सहकार्य कधीच विसरू शकणार नाही.येथील विविध जागृत व अभ्यासू लोकप्रतिनिधी बरोबर काम करत असताना प्रशासकीय कामात अधिक गतिमानता आणण्यासाठी मदत झाली.व ज्ञानात देखील भर पडली. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी वेंगुर्लेकर यांसारखे अधीकारी खारेपाटण ग्रामपंचायतीला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो.एक अभ्यासू आणि प्रशासनाची जान असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी ज्या ग्रामपंचायतीला लाभेल त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे भावपूर्ण उदगार काढत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर गावातील ग्रामस्थानी देखील ग्रामविकास अधिकारी वेंगुर्लेकर याना सदिच्छा समारंभात मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!