खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेच्या व्हॉईस चेअरमनपदी संस्थेचे संचालक व वारगाव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. खारेपाटण सोसायटीच्या संचालक मंडळ कार्यकारणीची सभा नुकतीच संस्थेचे विद्यमान चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेत संस्थेच्या व्हॉईस चेअरमन पदी एकनाथ कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर संस्थेचे माजी व्हॉईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर यांनी एकनाथ कोकाटे याना शुभेछा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक विजय देसाई, रवींद्र शेट्ये, मोहन पगारे, भाऊ राणे, श्रीधर गुरव, अशोक पाटील, इस्माईल मुकादम, मंगेश गुरव, उज्ज्वला चिके, संस्थेचे सचिव व कार्यलक्षी संचालक कृष्णा कर्ले आदी मान्यवर संचालक यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण सोसायटीच्या व्हॉईस चेअरमन निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कणकवली येथील उपनिबंधक सुनिता भोगले यांची नियुक्ती सहकार खात्याकडून करण्यात आली होती. तर खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित व्हॉईस चेअरमन एकनाथ कोकाटे यांनी संस्थेने आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पडणार असल्याचे सांगून सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. संस्थेचे विद्यमान चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी नवनिर्वाचित व्हॉईस चेअरमन एकनाथ कोकाटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी संस्थेचे सचिव कृष्णा कर्ले यांनी सर्वांचे आभार मानले.












