बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

नाधवडे गावातील प्रथम हज यात्रेकरु जमाल नाईक यांचे केले स्वागत

वैभववाडी (प्रतिनिधी) : हज यात्रा ही मुस्लिमांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे, जी इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. ही यात्रा सौदी अरेबियातील मक्का येथे केली जाते, जिथे काबा आहे. दरवर्षी लाखो मुस्लिम हज यात्रेसाठी मक्का येथे एकत्र येतात आणि धार्मिक विधी पूर्ण करतात. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील रहिवासी जमाल नाईक हे हज यात्रा पूर्ण करून आपल्या नाधवडे गावात दाखल झाले. नाधवडे गावातील हज यात्रेस जाणारे ते पहिले यात्रेकरू आहेत. त्याबद्दल सामाजिक बांधिलकी म्हणून बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने त्यांचे गावात स्वागत करण्यात आले यावेळी नाधवडे गावचे सरपंच लीना पांचाळ, माजी सभापती बंड्या मांजरेकर, तंटामुक्ती परशुराम इस्वलकर,, माजी उप सरपंच श्रीरंग पावसकर, गावचे पाटील प्रभाकर शेट्ये, विशाल पावसकर. प्रकाश गुरव ग्रामसेवक कांबळे सर व नाधवडे ग्रामस्थ व बंड्या मांजरेकर मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!