खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना भात पीक बियाण्यांचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकरी बांधवांना नुकतेच भात शेती बी बियाण्यांचे वाटप सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, माजी ग्रा.पं.सदस्य योगेश पाटणकर, ग्रा.पं.कर्मचारी राजेश जाधव, उमेश राऊत, अजय तेली, संगिना गुरसाळे तसेच शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. सद्या पेरणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना भात बियाण्याची गरज लक्षात घेता खारेपाटण ग्रामपंचायतीने गावातील गरजू सुमारे ४५ शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप केले असून शेतकरी बांधवामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!