करूळ गगनबावडा घाटात दरड कोसळली ; सर्व वाहतूक बंद

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे. तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे आज सकाळी करूळ घाटात दरडीचा मोठा मातीचा भाग कोसळून रस्ता वर पूर्ण पणे मातीचा ढिगारा आल्याने वाहतुकीत पूर्ण पणे बंद झाला आहे त्यामुळे या घाटातून कोल्हापूर कडे जाणारी आणि येणारी एसटी सह सर्व वाहतुक भुईबावडा व फोंडा घाटातून वळविण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने माती दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकर हा घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असे सांगण्यात येते आहे.

error: Content is protected !!