अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर आज सोमवार दि.१६ जून रोजी महाराष्ट्रात सर्व शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२५ च्या पहिल्या दिवशी प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली. प्रशातेल पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नविन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या उत्साहात नविन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला.

error: Content is protected !!